Sushmita Dhumal : सातारच्या लेकीचा अटकेपार झेंडा; अॅड. सुश्मिता धुमाळची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड
राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये सातारच्या लेकीने अटकेपार झेंडा रोवला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील करांजकोप गावातील ॲड. सुश्मिता भालेराव धुमाळ असं या युवतीचे नावं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया युवतीने फॉरेव्हर मिस इंडिया 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या सुंदरीने फॉरेव्हर मिस इंडिया 2022 या स्पर्धेत आपले नावलौकिक मिळवल्याने तिचे देशभरातून कौतुक होत आहे.
जयपूर राजस्थान येथे या संदर्भात देशात सर्वात मोठी असलेली इंटर नॅशनल लेवल ब्युटी पॕजेंट फॉरेव्हर मिस इंडिया सीजन 2 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातून अनेक सुंदर युवतीसह महाराष्ट्रातूनही अनेक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता.
या वेळी ॲड. सुश्मिता धुमाळने या सौंदर्य स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. सुरूवातीला सातारा जिल्ह्यातून निवड होऊन Forever Miss Satara आणि त्यानंतर Forever Miss Maharashtra तसेच आता Forever Miss India या किताबावर वर देखील आपले नाव कोरले गेले.
अष्टपैलू असणारी ही सातारची सुंदरी व्यवसायाने वकिल आहे. त्याचसोबत त्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे Ph.D देखील करत आहेत. दरम्यान कथ्थक आणि अभिनयाची आवड असलेल्या या सुंदरीने यावेळी टॅलेंट राऊंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय आणि 'भारत की बेटी' या गीतावर कथ्थक नृत्याविष्कार सादर केला.
याप्रसंगी ॲड. सुश्मिता धुमाळ यांना क्राऊन, ट्रॉफी सर्टिफिकेट, सॅश आणि धनादेश देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले.
यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या 138 देशांतील स्पर्धकांमध्ये त्या पात्र ठरल्या असून भारताचे नेतृत्व करणार आहे.