विकास कुठाय? राज्यातील पहिला मतदार राहत असलेल्या उपेक्षित मणिबेली गावाची कहाणी, रस्ता नाही, ना कुठल्या सुविधा...
विकास कुठाय? राज्यातील पहिला मतदार राहत असलेल्या उपेक्षित मनीबेली गावाची कहाणी, रस्ता नाही, ना कुठल्या सुविधा...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात समृद्धी महामार्ग आणि अनेक विकासाच्या मॉडेलच्या गप्पा होत आहेत, मात्र आजही सातपुड्याच्या दुर्गम भागात अजूनही सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार राहतो त्या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्ते आणि विकास फक्त शहरी भागासाठी का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धडगाव तालुक्यातील मनीबेलीला रस्ता कधी मिळणार आणि हे गाव कधी विकासाचा मुख्य प्रवाहात येणार असा प्रश्न आता गावकरी उपस्थित करत आहेत.
राज्यातले पहिलं गाव म्हणून नंदुरबारच्या मणिबेलीची ओळख.
याच मणिबेलीतून राज्यातलं मतदाने पहिलं बूथ सुरु होते आणि येथेच राहतो राज्यातला पहिला मतदार.
मात्र स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना आजही मरण यातना भोगाव्या लागत आहे.
रस्ताच नसल्यानं विकासगंगा पोहोचली नसल्याने लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा साऱ्याच समस्या येथील नागरीकांना भेडसावत आहेत.
याबाबत कधी उपयायोजना होणार असा प्रश्न स्थानिक करत आहेत.
कोट्यवधींची उधळण करणाऱ्या मायबाप शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज या भागातील नागरिक व्यक्त करत आहे.