Tulip Festival : राजधानी दिल्लीत ट्युलिप फेस्टिवलची धूम!
नवी दिल्ली नगरपरिषदेच्या 'ट्युलिप फेस्टिव्हल'ची दुसरी आवृत्ती शनिवारपासून शांती पथाजवळील लॉनमध्ये सुरू झाली आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्लीमध्ये रविवार (11 फेब्रुवारी) रोजी शांती पथाजवळील लॉनमध्ये ट्युलिप्स फुलले आहेत. (Photo Credit : PTI)
रंगीबेरंगी ट्युलिप्सबरोबरच इतर अनेक प्रकारची फुले येथे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
या फुलांचे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येत आहेत. (Photo Credit : PTI)
तेथे फुललेल्या विविध प्रकारच्या ट्युलिप्स आणि इतर फुलांनी संपूर्ण उद्यान सुंदर दिसते आहे. (Photo Credit : PTI)
लोक या सौंदर्यांचे क्षण कॅमेरात टिपत आहे, तसेच या फुलांविषयी माहितीही घेत आहे. (Photo Credit : PTI)
आता ट्युलिप फेस्टिव्हलमुळे शांती पथाजवळील लॉन रंगीबेरंगी फुलांनी आणि लोकांच्या गर्दीने गजबजले आहे. (Photo Credit : PTI)
ट्युलिपची फुले नेदरलँडमधून आयात केली गेली आणि दिल्लीतील शांतीपथसह विविध लॉनमध्ये लावली गेली. (Photo Credit : PTI)
ट्युलिपची फुले साधारणत:फेब्रुवारीमध्ये फुलू उमलतात.तसेच यातील काही प्रकारची फुले आधीच बहरली आहेत, बाकीची फुले फेब्रुवारीच्या अखेरीस उमलतील, ज्याचा आनंद येत्या काही दिवसांत लोकांना घेता येणार आहे. (Photo Credit : PTI)
या महोत्सवादरम्यान शांतीपथाच्या आजूबाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. (Photo Credit : PTI)