आठवड्याच्या 'या' दिवशी स्वस्त विमान तिकीट मिळतात !
विमानाची तिकिटे ट्रेनपेक्षा जास्त महाग असल्याने प्रत्येकजण विमानाने प्रवास करू शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविमान तिकिटे कधी स्वस्त होतात याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
परंतु प्रवाशांच्या अनुभवांनुसार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसात तिकीट दर कमी असतात.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान तिकिटांची किंमत इतर दिवसांच्या तुलनेत या दिवसात कमी राहते.
त्याच वेळी, शुक्रवार, शनिवार किंवा रविवारी तिकिटे महाग असतात.
निष्कर्षानुसार, जानेवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये विमान तिकिटांचे दर जास्त असतात, असं मानलं जातं.
या काळात दिवाळी, होळी, छठ पूजा, नवरात्री, नाताळ, न्यू इयर सारखे प्रमुख सण साजरे केले जातात म्हणून या कालावधीत तिकीट दर जास्त असतात.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.