Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : चंद्रपुरात एकाच घरात दोन राज्यांच्या सीमा, स्वयंपाकघर महाराष्ट्रात तर बैठक खोली तेलंगणात
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात अडकली आहेत. मात्र या 14 गावातील एक घर असंही आहे जे दोन राज्यांच्या सीमांनी विभागलं गेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील आणखी एक महत्त्वाची रंजक गोष्ट म्हणजे या गावातील एका घराचे स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर बैठक खोली ही तेलंगणात येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महाराज गुडा या गावात हे अनोखं घर आहे. हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात विभागलं गेलं आहे.
तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर.
महाराज गुडा गावातील आठ खोल्यांच्या या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. 1960 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात पवार कुटुंब जिवती मध्ये स्थलांतरित झालं.
अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिल्यावर अचानक तेलंगणाच्या सरकारने या 14 गावांवर स्वतः चा हक्क सांगितला आणि त्यामध्ये महाराज गुडा या गावाचा समावेश होता.
त्यामुळं अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आहे. त्यातही हद्द म्हणजे पवार यांचं घर तर दोन्ही राज्याच्या सीमांनी विभागलं गेलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात.
या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये आणि कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते.
मात्र हा सर्व वाद चुकीचा असून ही गावं महाराष्ट्राचीच असल्याचा या भागातील लोकांचा दावा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील ही गावं महाराष्ट्राची असल्याचं मान्य केलं आहे.