लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात विहंगम दृश्य; भगवान विष्णुंना सोनेरी किरणांचा सोनसळी अभिषेक
वैज्ञानिक महत्वासोबत अध्यात्मिक ओळख असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना म्हणजे दैत्यसुदन मंदिर होय. मे महिन्यात हे मंदिर पर्यटकांसाठी मेजवाणी आणि डोळ्याचं पारणं फेडणारं आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे मंदिर प्राचीन भारतातील वैभवसंपन्न सत्तेची , प्रगत स्थापत्यशैलीची , समाजजीवनाची ओळख करून देतं. आत गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि पायांखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती आपल्याला जागीच खिळवून ठेवते.
मूर्तीत धातूचे प्रमाण जास्त आहे, येथील दैत्यसुमन मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीच्या मस्तकी कालपासून सूर्यकिरणांच्या अभिषेक होत आहे. ही लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे.
दरवर्षी मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक होत असतो. यंदाही कालपासून लोणार येथील मंदिरात थेट सूर्यकिरण गाभाऱ्यातील भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडत आहेत.
सूर्यकिरणांच्या होणारा अभिषेकामुळे भगवान विष्णूच्या मूर्तीच विहंगम रूप बघायला मिळत आहे. त्यामुळे, भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणार येथे येत आहेत.
हे मंदिर प्राचीन भारतातील वैभवसंपन्न सत्तेची , प्रगत स्थापत्यशैलीची , समाजजीवनाची ओळख करून देतं. आत गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि पायांखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती आपल्याला जागीच खिळवून ठेवते. मूर्तीत धातूचे प्रमाण जास्त आहे.
दरम्यान, दैत्यसुदन मंदिर, लोणार राजा विक्रमादित्य यांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. गावाच्या मध्यभागी विशाल जागेवर हे मंदिर आहे. 1878 साली मातीच्या टेकडीच्या उत्खनन केल्यावर याचा शोध लागला.
हे मंदिर वास्तशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरात लवणासुराच्या वधाबद्दल उत्तम शिल्प आहे. गर्भगृहात असणारी मूर्ती विष्णूची. अशाच प्रकारचे मंदिर कर्नाटकातील हेलेबील बेलूर येथे चन्नाकेशव मंदिरासारखे आहे.