PHOTO : विठ्ठल भेटीची लागली ओढ... गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान
तब्बल दोन वर्षानंतर यंदा आषाढी यात्रा (Ashadhi Yatra) निर्बंधमुक्त साजरी होणार आहे. यंदा आषाढीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी शेगाव येथून निघाली आहे.
आज सकाळी 7 वाजता शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर, दुपारी नागझरी येथे आगमन आणि पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
700 भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी 750 किमी जाणार आहे.
संत गजानन महाराजांची पालखी पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.
वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे.
यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचं हे 53 वर्ष आहे.
गेल्यावर्षी शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा आरती करून पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे.