Buldhana: विवेकानंद जन्मोत्सव सोहळा' उत्साहात साजरा; महाप्रसादाची जय्यत तयारी, दोन लाख भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद
लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे. आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादच वितरण होणार आहे.
Continues below advertisement
Feature Photo
Continues below advertisement
1/9
निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘विवेकानंद जन्मोत्सव सोहळा’ दरवर्षी साजरा करण्यात येतो
2/9
यंदा हा 160 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातो. कोरोनानंतर यंदा हा उत्सव पहिल्यांदाच उत्साहात साजरा करण्यात आला.
3/9
या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.
4/9
या महापंगतीच्या महाप्रसादाच्या निर्मिती कामाला काल पहाटे पासूनच सुरुवात झाली.
5/9
लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे. आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादच वितरण होणार आहे.
Continues below advertisement
6/9
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
7/9
100 ट्रॅक्टरद्वारे दीड हजार कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी करण्यात येणार आहे.
8/9
भाविकांना 151 क्विंटल गव्हाची पुरी, 105 क्विंटल वांग्याची वैदर्भीय चवीसाठी प्रसिद्ध असलेली भाजी या महाप्रसादाचे वितरण होणार आहे.
9/9
महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे ब्रह्ममुहुर्तावर प्रारंभ झाला. हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला आहे. 50 एकर जागेत दोन लाख भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद देण्यात येणार आहे.
Published at : 14 Jan 2023 08:14 AM (IST)