बाप रे बाप, कारमध्ये भलीमोठी कॅश; बुलढाणा पोलिसांची कारवाई, कोटी रुपयांचे 500 चे बंडल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Buldhana police seized cash 1 crore

1/7
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराजवळ कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
2/7
बुलढाणा पोलिसांनी ही कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे
3/7
गोपनीय माहितीच्या आधारे आज बुलढाणा पोलिसांनी कारवाई करत मलकापूर शहराजवळ एका कारमधून 1 कोटी 97 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
4/7
औरंगाबादहून मलकापूरच्या दिशेने ही कार जात असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
5/7
कारमधील दोघांनी रोकडबद्दल समर्पक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत.
6/7
धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होतं, त्यांना देण्यासाठीच ही रक्कम असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता
7/7
जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती.
Sponsored Links by Taboola