Buldhana News: लेकीच्या जन्माचा आनंद...! बापाने गावात वाटली तब्बल 300 किलो जिलेबी
बुलढाणा जिह्यातील अमडापुर येथील डॉ.विशाल देशमुख यांना गेल्या महिन्यात कन्यारत्न प्राप्त झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशाल देशमुख हे आपल्या लाडक्या लेकीला भेटायला सातारा जिल्ह्यातील वाई या गावी आपल्या संपूर्ण परिवारासह गेले.
विशाल यांच्या घरात पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला
या आनंदात देशमुख यांनी ढोल ताशांच्या गजरात गावात 300 किलोंची जिलेबी वाटत आनंद साजरा केला.
विशाल यांच्या घरात पहिल्यांदाच कन्यारत्न झाल्यानं त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं आगमन अतिशय थाटात केलं.
त्यांच्या या आनंदाची चर्चा साऱ्या पंचक्रोशीत पसरली आहे.
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या हव्यासापोटी गर्भातच कळी खुडण्याचे प्रकार आजूबाजूला घडत आहेत.
असं असताना मात्र वंशाची पणती असलेल्या स्त्री जन्माचे स्वागत चक्क जिलेबी वाटून करण्यात आले त्यामुळे कौतुक होत आहे
सर्वच क्षेत्रांत मुलींनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे भेदभाव न करता जन्माला आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करावे, यासाठी हा सोहळा साजरा केला.
मुलगी जन्माला आल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी अवघ्या गावाचं तोंड गोड केलं.
तब्बल 300 किलो जिलेबी विशाल देशमुख यांनी गावात वाटली