Pune News : उजनी जलाशयातील अवैध वाळू उपश्यावर सर्वात मोठी कारवाई; वाळू माफियांना मोठा दणका

करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी ते इंदापूर तालुक्यातील माळवाडी दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्या 11 बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उडवून नष्ट करण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूर व पुणे जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सामान्य प्रशासन तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,करमाळा नायब तहसिलदार लोकरे,करमाळा पोलिस प्रशासन यांच्या पथकाने उजनी जलाशय परिसरात ही कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे वाळू माफियांना मोठा दणका बसला असून अवैध वाळू उपश्यावर ही सर्वात मोठी कारवाई मनाली जात आहे.
दरम्यान वाळू माफियां विरोधात आता प्रशासन अधिक कठोर पाऊले उचलत असल्याचे बोलले जात आहे.