Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : आठवडाभरानंतर बुलढाण्यात सूर्यदर्शन, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हिरवळीने सौंदर्य खुललं
बुलढाणावासियांना एक आठवड्यानंतर आज सकाळी सूर्यदर्शन झाले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात जिल्ह्यात गेल्या आठवडाभर रिमझिम आणि संततधार पाऊस आणि सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होत नव्हते.
परंतु या पावसामुळे धरित्री आता हिरवीगार झाली असून रानफुलंही चांगलीच बहरुन आली आहेत.
बुलढाणा शहरानजीक असलेल्या अजिंठा पर्वतरांगा असल्याने यातील निसर्गसौंदर्य खुलून गेलं आहे.
संपूर्ण परिसरही विविधरंगी फुलांनी फुलला आहे.
पावसाळा सुरु झाल्यानंतर तालुक्यातील माळरानात, डोंगरावर विविध प्रकारच्या फूल वनस्पती उगवतात.
सर्वत्र हिरवळ असल्याने त्यावर पडणाऱ्या आल्हाददायक सूर्यप्रकाशाने निसर्गाच सौंदर्य पाहून डोळे दीपून जात आहे.
सकाळी या निसर्गाचं अवलोकन करणाऱ्यांची गर्दी राजूर घाटात दिसून आली.
आठवडाभरानंतर पावसाने उघडीप दिल्याने आज सकाळी शहरवासी घराबाहेर पडले आहेत.