PHOTO : राजुरीत उलट्या छत्र्या धरून प्रसाद झेलण्याचाही अनोखी प्रथा
बीडच्या राजुरीमध्ये गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी काला महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजुरी गावामध्ये मंगलमूर्ती गणेशाचं जागृत देवस्थान आहे, पूर्वीपासूनच राजुरी गावामध्ये पाच दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
काला महोत्सवाला पंचक्रोशीतून शेकडो भाविक गर्दी करत असतात.
पाचव्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार करून तो मंदिराच्यावरून खाली उभ्या असलेल्या भक्तांच्या छत्र्यांमध्ये टाकला जातो.
हा प्रसाद झेलण्यासाठी पंचक्रोशीतील लोक छत्र्या सोबत घेऊन या कार्यक्रमात सहभागी होत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून राजुरीच्या ग्रामस्थांनी ही परंपरा जोपासली जाते.
आजच्या दिवशी राजुरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं.
ज्वारीच्या लाह्या, दही, कोथिंबीर, भिजवलेली हरभरा डाळ यांपासून रुचकर असा काल्याचा प्रसाद बनवला जातो.
हाच काला भाविकांना त्यांच्या उलट्या छत्र्यात आजूबाजूच्या इमारतीवरून आणि मंदिरावरून टाकला जातो.