Photo: एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बीडच्या एका गडावरुन हेलिकॉप्टरने आणल्या पादुका, पाहा फोटो
बीडमधील (Beed) नारायण गडावर असलेल्या नगद नारायण महाराजांच्या पादुका सुरळी गावात सुरू होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी थेट हेलिकॉप्टर (Helicopter) मधून आणण्यात आल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासाठी पुण्याहून हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. याच आठवड्यात गहिनीनाथ गडावरून वामन भाऊच्या पादुका या हेलिकॉप्टरने आणण्यात आल्या होत्या.
त्यामुळे आठवड्यात दोन वेळा हेलिकॉप्टरनं पादुका आणल्या गेल्या आहेत.
बीड तालुक्यातल्या नारायण गडावर हेलिकॉप्टर नगद नारायण महाराज यांच्या पादुका त्यांच्या जन्म गावी घेऊन जाण्यासाठी मागवण्यात आलं होते.
नगर नारायण महाराज यांचं जन्म गाव असलेल्या सुरळे गावात 71 व्या नारळी सप्ताहाचा आयोजन करण्यात आला आहे आणि त्या निमित्ताने नगर नारायण महाराज यांच्या पादुका थेट हेलिकॉप्टरमधून सुरळे गावात पोहोचल्या आहेत.
तर महादेव महाराजांनी या नारळी सप्ताहाची सुरुवात केली होती. दरवर्षी वेगवेगळ्या गावात या सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी सुरेगावमध्ये हा सप्ताह होत आहे.
त्यानिमित्त पादुका आणि गडाचे महंत यांना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. नारायण गडावरून सुरळे गावात येण्यासाठी या हेलिकॉप्टरला वीस मिनिटांचा वेळ लागला.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ गडावरून देखील महाराजांच्या पादुका नेण्यासाठी अशाच एका हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.
तर नारायणगडावर पुण्याहून बोलवलेल्या हेलिकॉप्टर साठी लाखो रुपयांचा खर्च भाविकांनी केला.
भाविकांनी चक्क हेलिकॉप्टरमधून पादुका गावात आल्यानंतर या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं पूजन करण्यात आलं.