Beed Unseasonal Rain : सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पावसामुळं बीडमध्ये शाळेचं नुकसान; गोपाळपूर जिल्हा परिषद शाळेचे पत्रेच उडाले
Beed Unseasonal Rain : राज्यभरात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालपासूनच राज्यातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
दोन ते तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
पावसामुळे बीडमध्ये झालेल्या नुकसानीच्या अनेक घटना समोर येत आहेत.
काल (शनिवारी) झालेल्या वादळी वाऱ्यानं धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले.
वादळी वारा आणि पाऊस यांमुळे शाळेचं नुकसान झालं आहे.
शाळा सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत आणि त्यात शाळेचं झालेलं नुकसान यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शाळेवरचे पत्रे उडून गेल्यानं आता विद्यार्थ्यांना शाळेत बसवायचं कुठे? असा मोठा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे.