जबरदस्त लूक, पॉवरफुल इंजिन; Volkswagen Tiguan Exclusive Edition लॉन्च
वाहन निर्माता कंपनी फोक्सवॅगनने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एसयूव्ही कार Tiguan चा Exclusive Edition लॉन्च केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन रंग पर्यायांसह या कारमध्ये बरेच कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे ही कार खूपच आकर्षक वाटत आहे.
Tiguan च्या या स्पेशल एडिशनची किंमत 33.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याच कारच्या फीचर्स आणि इतर महत्वाच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
फोक्सवॅगन टिगुआनच्या नवीन एक्सक्लुझिव्ह एडिशनमध्ये याचा प्युअर व्हाइट आणि ओरिक्स व्हाईट रंग सर्वाधिक लक्ष वेधून घेतो. यामुळे ही कार इतर कारपेक्षा वेगळी वाटते.
तसेच याच्या बूटलिडवर एक 'एक्सक्लुझिव्ह एडिशन' बॅजिंग देखील दिसत आहे. या एसयूव्हीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, यात 18-इंच सेब्रिंग स्टर्लिंग सिल्व्हर अलॉय व्हील्स, डायनॅमिक हबकॅप्स, एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प्स आणि अॅल्युमिनियम पेडल्स देण्यात आले आहेत.
तसेच यात 6-एअरबॅग्ज, पॅनोरामिक सनरूफ, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, हिल स्टार्ट असिस्ट, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल या सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
याच्या आधीच्या मॉडेलप्रमाणे यातही 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बो-चार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 187bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
हे इंजिन 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच कंपनीची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम देखील यामध्ये कायम ठेवण्यात आली आहे.
या एसयूव्हीच्या सध्याच्या फेसलिफ्ट मॉडेलची किंमत 31.99 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. या स्पेशल एक्सक्लुझिव्ह एडिशनची एक्स-शोरूम किंमत 33.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, ही कार भारतीय बाजारपेठेत नुकत्याच लॉन्च झालेल्या Citroen च्या C5 Aircross शी स्पर्धा करेल. फेसलिफ्टेड Citroen C5 Aircross मध्ये 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 174bhp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 36.67 लाख रुपये आहे.