लहान-मोठ्यांसाठी सुरक्षित; पाहा 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कारची यादी
भारतात आता कार खरेदी करताना सुरक्षितेच्या मुद्यावर अधिक भर देत आहेत. कार उत्पादक कंपन्यांकडूनही यावर जोर दिला जात आहे. ग्लोबल एनसीएपीकडून होणारे मूल्यांकन महत्त्वाचे मानले जाते. अनेकदा प्रौढांच्या सुरक्षितेकडे लक्ष दिले जाते. तर, मुलांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी एनसीएपी क्रॅश टेस्टिंगनुसार काही सुरक्षित कारची यादी सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahindra XUV700 : महिंद्राच्या कारला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याशिवाय चाइल्ड ऑक्युपाय सेफ्टीसाठी 4 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळाली आहे. एसयूव्हीने प्रौढांसाठीच्या सुरक्षितेत 17 पैकी 16.03 गुण मिळवले. तर, मुलांसाठीच्या सुरक्षितेसाठी 49 पैकी 41.66 गुण मिळाले आहेत.
Tata Punch:ही मायक्रो एसयूव्ही लोकप्रिय होत असून प्रौढांसाठीच्या सुरक्षितेसाठी 5 आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार रेटिंग आहे. प्रौढांसाठीच्या सुरक्षितेसाठी 16.45 अंक आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 40.89 गुण मिळाले आहेत.
Mahindra XUV300 ने ग्लोबल एनसीएपीच्या चाचणीत 17 पैकी 16.42 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 49 पैकी 37.44 गुण मिळाले आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्हीला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 4 स्टार मिळाले आहेत.
Tata Altroz: सध्याच्या काळात देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार असल्याचे म्हटले जाते. प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 3 स्टार मिळाले आहेत. ग्लोबल एनसीएपीच्या चाचणीत अल्ट्रोजला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 16.13 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 29 गुण मिळाले आहेत.
Tata Nexon : टाटा मोटर्सच्या या कारला प्रौढांच्या सुरक्षितेसाठी 5 स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी 3 स्टार गुण देण्यात आले आहेत. Tata Nexon ने नोव्हेंबर महिन्यात 16.13 गुण मिळवून 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या मोजक्या कारपैकी एक होती. लहान मुलांसाठी या स्वदेशी कॉम्पॅक्ट एसयूव्हीने 49 पैकी 29 गुण मिळवले.