हायड्रोजनवर चालणारी Toyota Mirai कार आहे तरी कशी? वाचा...
पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडलेले दर पाहता अनेकजण इलेक्ट्रिक कार खेरदी करण्यास पसंती दर्शवत आहेत. तसेच इलेक्ट्रिक कारची वाढलेली मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात घेऊन येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु, इलेक्ट्रिक कारला चार्ज करण्यासाठी वेळ लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी टोयोटानं त्यांची नवी हायड्रोजन कार टोयोटा मिराई बाजारात आणली.
इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यापेक्षा हायड्रोजन भरण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते इलेक्ट्रिक कारपेक्षा जास्त अंतर गाठू शकते.
मिराई ही हायड्रोजनवर चालणारी कार आहे. त्याचा पहिला मॉडेल 2014 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्याच मॉडेलला अपडेट्स करून बाजारात दाखल करण्यात आलं आहे.
मिराई ही हायड्रोजन इंधन सेल इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामध्ये तीन हायड्रोजन टाक्या आहेत आणि एक फ्यूल सेल आहे. तीन हायड्रोजन टाक्या आहेत, ज्यात 5.6 किलो हायड्रोजन ठेवता येते. याचा अर्थ असा आहे की 600 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर गाठण्यासाठी ही कार चांगली आहे.
टोयोटाची मिराई कार ही दिसायाला एका लक्झरी सेडानसारखी दिसते. या कारमध्ये मोठा स्पेस पाहायला मिळतो. त्याशिवाय, यात जेबीएल ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. ही कार चालवताना आवाज न करणाऱ्या एका इलेक्ट्रीक कार सारखी दिसते. साइड/स्टीयरिंगच्या बाबतीत या कारमध्ये चांगली डिझाईन करण्यात आली आहे.