Fastest Cars Available in India: 'या' आहेत देशातील सर्वात वेगवान कार, पाहा संपूर्ण यादी
भारतामध्ये चारचाकी वाहनांची आवड असणाऱ्या लोकांची काही कमी नाही. त्यामुळे दरवर्षी लाखो वाहनांची विक्री होते. आज आपण भारतामध्ये सर्वाधिक स्पीडने धावणाऱ्या कारविषयी जाणून घेणार आहोत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या स्पीडसाठी ओळखल्या जाणाऱ्या कारच्या यादीमधील पहिले नाव Lamborghini Aventador LP - 7804 अल्टीमेट आहे. या कारची स्पीड प्रति तास 355 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 9 कोटी रूपये इतकी आहे.
या यादीतील दुसरी कार SF90 Stradley Coupe V8 आहे. या कारचा स्पीड प्रति तास 340 किमी इतकी असून कारची किमत 7.5 कोटी रूपये इतकी आहे.
तिसऱ्या क्रमाकांवर Porsche 911 Turbo S ही कार आहे. या कारचा स्पीड प्रति तास 330 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 31.3 कोटी रूपये इतकी आहे.
चौथ्या क्रमांवर Lamborghini Huracan EVO5.2 V10 ही कार असून ही कार प्रति तास 325 किमी इतक्या वेगाने धावते. या कारची किंमत 3.72 कोटी रूपये इतकी आहे.
या यादीतील पाचव्या क्रमांकावर Bentley Continental GT ही कार आहे. या कारचा स्पीड प्रति तास 318 किमी इतका आहे. भारतामध्ये ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 3.57 कोटी रूपये मोजावे लागतील.
शेवटची सर्वात बजेट फ्रेंडली आणि टॉप स्पीड मॉडेल Hyundai Grand i10 Nios कार आहे. या कारची टॉप स्पीड प्रति तास 160 किमी इतकी असून प्रतिलिटर 20 किलोमीटर इतके मायलेज देते. या कारची किमत 5.73 पासून ते 8.51 लाख इतकी आहे.