Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Honda Active Launched: Honda Activa H-Smart कीलेस फंक्शनसह भारतात लॉन्च, पाहा फोटो
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाची Activa स्कूटर ही देशात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. विशेष करून तरुणाईची या स्कूटरला मोठी पसंती आहे. यामुळेच बाजारात या स्कूटरला मोठी मागणी असून ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. अशातच आता कंपनीने Activa चे H-Smart व्हेरिएंट लॉन्च केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने या स्कूटरची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 74,536 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह कंपनीच्या सध्याच्या Activa 6G चे अपडेटेड मॉडेल आहे.
होंडाच्या मते, नवीन अॅक्टिव्हा एच-स्मार्ट तीन ट्रिममध्ये आणण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट यांचा समावेश आहे. त्यांच्या एक्स-शोरूम किंमती अनुक्रमे 74,536, 77,036 आणि 80,537 रुपये आहे.
कंपनीचा दावा आहे की या स्कूटरमध्ये स्मार्ट फाईंड फीचर देण्यात आले आहे. जेणेकरुन जेव्हा ग्राहक स्मार्ट की वापरून स्कूटरला गर्दीत शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्कूटर अलार्म वाजतो आणि प्रतिसाद मिळतो.
या फीचरच्या मदतीने रायडर फिजिकल चावीशिवायही स्कूटर लॉक आणि अनलॉक करू शकतो.
हे फीचर स्मार्ट कीद्वारे स्कूटरपासून दोन मीटरच्या अंतरात शोधले जाऊ शकते. यासोबतच नवीन अॅक्टिव्हा एच-स्मार्टमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचही देण्यात आला आहे.
नवीन Honda Activa H-Smart मध्ये 12-इंच फ्रंट अलॉय व्हील, मोठा व्हीलबेस, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, लांब फूटबोर्ड एरिया, नवीन पासिंग स्विच, अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन आणि DC LED हेडलॅम्प्स मिळतात. यामुळे ही स्कूटर रायडकरताना आरामदायी अनुभव येतो.
कंपनीने Activa H-Smart मध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. यात 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. OBD2 सह या इंजिनमध्ये एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान देखील जोडण्यात आले आहे. यासोबतच अपडेटेड प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन, नवीन स्मार्ट टम्बल टेक्नॉलॉजी, एसीजी स्टार्टर आणि फ्रिक्शन रिडक्शन टेक्नॉलॉजी यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. पॉवरट्रेन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
भारतात TVS Jupiter ची एक्स-शोरूम किंमत 73,488 रुपये आहे. ही 6 प्रकार आणि 16 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.7cc BS6 इंजिन आहे. जे 7.77 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करते.