In Pics : आता एकाच छताखाली यामाहाच्या सर्व बाईक्स, अत्याधुनिक नवं शोरुम पाहिलत का?

वेगासाठी आणि खास स्पोर्ट्स लूकसाठी यामाहाच्या बाईक्स आधीपासून प्रसिद्ध आहेत. R15 बाईकने तर कित्येक वर्ष भारतीय बाजारपेठ गाजवली असून आता यामाहाच्या सर्व बाईक्स आणि स्कूटी एकाच छताखाली विक घेता येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यामाहाने ‘ब्लू स्क्वेअर’ असे आधुनिक प्रकारटे तीन नवे शोरुम ठाणे, उल्हासनगर आणि साकिनाका या ठिकाणी सुरु केले आहेत.

या ठिकाणी यामाहा कंपनीच्या स्कूटर्सपासून ते लेटेस्ट स्पोर्ट्स बाईक्सपर्यंत सर्व काही या शोरुममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
यामुळे ग्राहकांना फक्त बुकलेटमध्ये फोटो न पाहता प्रत्यक्षात बाईक पाहता येणार आहे, ज्यामुळे अगदी आधुनिक अनुभव ग्राहकांना मिळेल.
बाईक्ससह याठिकाणी बाईक्ससंबधी इतरही गोष्टी जसंकी बाईक ऑईल, रायडर्स जॅकेट अशा विविध गोष्टीही ग्राहकांना विकत घेता येतील.
विशेष म्हणजे या शोरुममध्ये ग्राहकांना फक्त बाईक विकण्यासह यामाहा ब्रँडशी जोडण्याचा प्रयत्न कऱणार असल्याचं यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
यामाहाची एरॉक्स 155 (Aerox 155) ही लेटेस्ट स्कूटी देखील या शोरुममध्ये ग्राहकांना पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे एरॉक्स 155 ही स्कूटर ही या ब्लू स्केअर शोरुममध्येच मिळत असून या नव्या तीन शोरुममुळे महाराष्ट्रात 5 ब्लू स्केअर शोरुम झाले आहेत.
या शोरुमचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी यामाहा मोटर इुंप्रडया ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन इशीन प्रचहाना यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
यामाहा कंपनीच्या या नव्या शोरुममध्ये ग्राहकांना योग्य ती बाईक निवडण्याकरता आणि विस्तृत माहिती देण्याकरता उत्तम माहिती असलेले कर्मचारी याठिकाणी कार्यरत असल्याचंही कंपनीने सांगितलं.