Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फोटो पाहताच प्रेमात पडाल, येत आहेत Yamaha चे 'हे' दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार जोरात आहे. अनेक वाहन निर्माता कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. अशातच आता आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एंट्री करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामाहा लवकरच आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी Yamaha E01 आणि Yamaha NEO या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. यामाहाने या इलेक्ट्रिक स्कूटर्सचे डीलर्स मीटमध्ये प्रदर्शन देखील केले आहे.
Yamaha ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर Neo (Yamaha NEO) गेल्या महिन्यात युरोपियन बाजारात लॉन्च केली होती. तज्ञांचे म्हणणे आहे की, यामाहा निओ ई-स्कूटर अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, त्याला किरकोळ स्क्रॅच येऊ शकत नाहीत.
कंपनी आपल्या Yamaha E01 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सध्या तैवानमध्ये सुरू केली आहे. आता या स्कूटर्स लवकरच भारतीय बाजारात दाखल होत आहेत. या स्कूटर्स डीलर्स मीटमध्ये सादर करण्यात आल्या.
यामाहा E01 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कीलेस इग्निशन सारखी फीचर्स दिली जाऊ शकतात. या स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि पॉवर असे तीन रायडींग मोड दिले जाऊ शकतात. एका बॅटरी पॅकसह, पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 70-80 किमीचा पल्ला गाठू शकते.
यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर 50.4V आणि 19.2Ah लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते. या बॅटरी पॅकसोबत जोडलेली इलेक्ट्रिक मोटर 2.5 kW पॉवर आणि 136 न्यूटन मीटर टॉर्क स्टँडर्ड मोडमध्ये जनरेट करते.