BMW S1000 फ्लॅगशिप बाईक आली; 999cc चे दमदार इंजिन, किंमत 24.45 लाख
जर्मनीची प्रसिद्ध कंपनी BMW जगभरात आपल्या आलिशान कारसाठी ओळखली जाते. यासोबतच कंपनीच्या स्टायलिश बाईक (Sports Bike) देखील जगभरात प्रसिद्ध आहे. BMW च्या बाईक फक्त दिसायलाच चांगल्या नाही तर त्या पॉवरफुल आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच BMW Motorrad ने आपल्या BMW S1000 फ्लॅगशिप बाईक नवीन अवतारात भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. नवीन डिझाईन आणि अधिक दमदार इंजिन असलेली ही बाईक बाजारात उपलब्ध आहे.
या बाइकमध्ये कंपनीने अंक आधुनिक फीचर्स दिले आहे. जास्त गतीने बाईक चालवणाऱ्यांना ही बाईक खास करून आवडले. याच बाईकच्या इंजिन, फीचर्स आणि किंमत बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले, तर यात 999cc इन-लाइन 4-सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 13,750 rpm वर 206 bhp ची पॉवर आणि 11,000 rpm वर 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये आणखी एक इंटेल फनेल देण्यात आला आहे. ज्यामुळे याची पॉवर वाढते.
बीएमडब्ल्यूच्या या नवीन बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये वरच्या बाजूच्या विंगलेटसह नवीन लिव्हर जोडले आहेत. ते आता रायडरच्या वेगावर अवलंबून 10 किलो डाउनफोर्स तयार करतात.
यामुळे ट्रॅक्शन कंट्रोलवरील दबाव कमी होतो, तर त्याचे Acceleration Tire ची Tendency कमी करण्यासाठी कार्य करते.
या बाईकला हलके आणि स्पोर्टी बनवण्यासाठी मागील भाग नवीन डिझाइनमध्ये बनवण्यात आला आहे. यासोबतच इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत.
बाईकला आता यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि मानक म्हणून एम बॅटरी मिळते. तसेच एक नवीन रेव्ह काउंटर डिस्प्ले आहे, 6.5 इंच TFT स्क्रीन अधिक फीचर्ससह आहे, जे डाव्या हँडलबारवर आहे. यासोबतच मल्टीकंट्रोलर, ब्रेक स्लाइड असिस्ट फंक्शन, प्रो स्लीक सेटिंग फंक्शनसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, विशेष ट्रेडलेस स्लीक टायर्स यासह अनेक अत्याधुनिक फीचर्स या बिकमध्ये देण्यात आले आहे.
या नवीन बाईकची एक्स-शोरूम किंमत 20.25 लाख ते 24.45 लाख रुपये आहे. ही बाईक स्टँडर्ड, प्रो आणि प्रो एम स्पोर्ट या व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.