कमी किंमतसह मिळत आहेत जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या कशी आहे मारुतीची नवीन 'बलेनो'
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन 'बलेनो' भारतात लॉन्च केली आहे. ही कार मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने जेव्हा पहिल्यांदा ही कार लॉन्च केली होती, त्यावेळी लॉन्च होताच ही कार कंपनीच्या टॉप सेलिंग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कारने कंपनीची लोकप्रिय कार स्विफ्टलाही विक्रीत मागे सोडले होते. कंपनीने ही कार 2015 मध्ये नवीन अवतारात लॉन्च केली होती. आता कंपनी पुन्हा नव्याने आपली बलेनो घेऊन आली आहे.
नवीन बलेनो अजूनही हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच्या चेसिसमधील बदलांसह चांगल्या बिल्ड क्वालिटीसाठी आणि क्रॅश टेस्टमध्ये चांगल्या कामगिरीसाठी हाय स्ट्रेंथ स्टील जोडले गेले आहे. त्यामुळे नवीन बलेनोचे वजन जुन्या मॉडेलपेक्षा अधिक आहे.
कंपनीने यात मोठी ग्रील आणि नवीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह दिले आहे. जे पूर्वीच्या बलेनो हेडलॅम्प्स तसेच नवीन डीआरएल लाइटिंग सिग्नेचरपेक्षा खूप मोठे आहेत. यात 16 इंचचे अलॉय व्हील्स दिले आहेत. कंपनीने ही कार पाच रंग पर्यायासह लॉन्च केली आहे.
कंपनीने यात 1.2 लिटर इंजिनसोबतच DualJet तंत्रज्ञानासह सिंगल पेट्रोल इंजिन पर्याय दिला आहे. हे चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन 90bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅण्डर्ड आहे. यात एक AMT गिअरबॉक्स देखील आहे. जे मागील बलेनोच्या CVT ऑटोमॅटिकची जागा घेतो.
अनेक फीचर्स असूनही टॉप-एंड बलेनो ही सर्वात स्वस्त कार आहे. ज्याची किंमत 9.4 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. याच्या मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन बलेनो जवळपास सर्वच फिल्डमध्ये जबरदस्त आहे.