Navneet Rana: बाई मी पतंग उडवित होते; खासदार नवनीत राणा यांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद
मकरसंक्राती निमित्ताने सगळीकडे पतंग उडवण्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपतंग उडवण्याचा आनंद सगळ्याच स्तरातील व्यक्ती लुटत आहेत.
अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते.
युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त पतंग महोत्सवाचे अमरावती शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कुल मैदानात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पतंग महोत्सवात लहान मुलांना पंतगीचे वाटप करण्यात आले.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पंतग उडवण्याचा आनंद लुटला.
सोशल मीडियावर नवनीत राणा यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पतंग उडवतानाचा उत्साह त्यांच्यासह पती रवी राणा यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होता.
यावेळी रवी राणा यांनी नवनीत राणा यांना पतंग उडवण्यासाठी काही टिप्सही दिल्या.
यावेळी राणा दाम्प्त्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.