Amravati : अमरावती येथील तरुणीने रांगोळीतून साकारले 'गजानन महाराजांचे रुप'!
आज 3 मार्च रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा केला जात आहे. हा श्री संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिन आहे. (Photo Credit :Reporter/Amravati)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Photo Credit :Reporter/Amravati)
या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. (Photo Credit :Reporter/Amravati)
शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचं तिसरं रूप म्हणून ओळखलं जातं. (Photo Credit :Reporter/Amravati)
लोक विविध पद्धतीने आपली भक्ती महाराजांपर्यंत पोहचवत असतात. (Photo Credit :Reporter/Amravati)
अशातच अमरावती येथील एका तरुणीने रांगोळीतून गजानन महाराजांचे रुप साकारले आहे. (Photo Credit :Reporter/Amravati)
गजानन महाराजांच्या प्रकटदिनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील 'क्षिती रेवस्कर' हिने गजानन महाराजांची भव्य रांगोळी साकारली. ही 70 स्क्वेअर फुटाची सुंदर रांगोळी आहे. (Photo Credit :Reporter/Amravati)
विजय ग्रंथ पारायण अध्याय दोन मधील गजानन महाराजांचे चित्र तिने साकारले आहे. (Photo Credit :Reporter/Amravati)
रांगोळीच्या माध्यमातून गजानन महाराजांची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्याने परिसरात नागरिक रांगोळी पाहण्यासाठी येताना दिसताहेत. (Photo Credit :Reporter/Amravati)
या भव्य रांगोळीतून गजानन महाराजांची प्रतिकृती साकारण्यासाठी क्षितीला 15 तासांचा कालावधी लागला. (Photo Credit :Reporter/Amravati)