अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत असून गेल्या 7 महिन्यांचे हफ्ते बँक खात्यात जमा झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे तब्बल 237 जागांवर विजय प्राप्त करत महायुतीने बहुमत मिळवले आहे.

दरम्यान, नव्याने सरकार स्थापन होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना स्वत:हून योजनेचा लाभ सोडावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, काही लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सोडायला सुरुवात केली आहे.
अकोल्याच्या जिल्हा महिला व बालविकास विभागकडून आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचे आवाहन केलं होतंय.
अकोला प्रशासनाच्या आवाहनानुसार, जिल्ह्यातील 50 महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
ज्यांना रोजगार आणि नोकरीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे, काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय अशा महिलांचे अर्ज स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहीण रद्द करण्याबाबत आले आहेत
दरम्यान, ही यादी आता शासन स्तरावर पाठवून डीबीटी मार्फत यांचं नाव वगळण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे, अशाही काही महिला आता या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.