Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला!
पुण्यात भुरट्या गुंडासह अट्टल गुंडगिरीचा कळस सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगजा मारणेची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसमधे आहे. दीड वर्षांपूर्वी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
यावेळी जयश्री मारणेंचा नवरा आणि कुख्यात गुंड गजानन मारणेनं पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवार आणि इतर नेत्यांचे स्वागत केले. (फोटो : प्रतिनिधी, एबीपी माझा, पुणे)
जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत. सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूडमधे आले असता त्यांनी जयश्री मारणेंच्या घरी भेट दिली. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
गजा मारणे कोथरूड परिसरात शास्त्रीनगर परिसरात आल्यानंतर गुन्हेगारीची मालिका सुरूच आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणेला अटक झाली. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या आहे.या टोळीवर 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)
गजा मारणेवर सहापेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. (Photo : facebook/ParthPawarSpeaks)