Ganesh Chaturthi 2022 : निद्रिस्त हनुमानाचे मंदिर पाहिलेत; पण निद्रिस्त बाप्पाचे मंदिर पाहिलेत का?
Ganesh Chaturthi 2022 : शेवगांव तालुक्यामधील आव्हाने बुद्रुक या गावामध्ये निद्रिस्त गणपतीचे मंदिर आहे. 250 वर्षांपेक्षाही जुने हे मंदिर असल्याचे सांगितले जाते.

Ganesh Chaturthi 2022
1/7
निद्रिस्त हनुमानाची मंदिर आपल्याला खुलताबाद,लोणार,अलाहाबाद येथे पाहायला मिळतात. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाने गावात निद्रिस्त गणपतीचे मंदिर आहे.
2/7
शेवगांव तालुक्यामधील आव्हाने बुद्रुक या गावामध्ये निद्रिस्त गणपतीचे मंदिर आहे. 250 वर्षांपेक्षाही जुने हे मंदिर असल्याचे सांगितले जाते.
3/7
शेतामध्ये काम करताना एका शेतकऱ्याला ही मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. हे अतिशय जुने बांधकाम असलेलं हेमांडपंती मंदिर असून अजूनही हे मंदिर सुस्थितीत आहे.
4/7
या मूर्तीची रेखीव रचना भाविकांच्या डोळ्यात भरते. या मंदिराच्या गाभाऱ्यात चार फूट लांब आणि तीन फूट खोल अशा हौदामध्ये ही मूर्ती विसवली आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या स्वयंभू गणपतीची ओळख असल्याने केवळ जिल्ह्यातूनच नाही तर राज्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
5/7
महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कुठेही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगावच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपती ओळखला जातो.
6/7
अतिशय दुर्मिळ अशी ही मूर्ती असल्याने राज्यभरातील भाविकांमध्ये मूर्तीबद्दल आकर्षण आहे.
7/7
गावचे रक्षण करणारा बाप्पा अशी धारणा इथल्या नागरिकांची आहे.
Published at : 06 Sep 2022 12:54 PM (IST)