शिर्डी मंदिरात फुले-हार नेण्यास परवानगीसाठी अनोखे आंदोलन
शिर्डी मंदिरात फुले-हार नेण्यास परवानगीसाठी अनोखे आंदोलन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर मंदिरं सुरू झाली मात्र आजही शिर्डीत फुले अथवा हार नेण्यास मनाई आहे.
याविरोधात अनेकदा निवेदन देऊन मागणी पूर्ण होत नसल्याने कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत संस्थान प्रशासनाचे लक्ष वेधले..
यावेळी शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहिली.. या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणी व्यवसायीकही सहभागी झाले होते..
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून दररोज हजारो साईभक्त येत असतात.. दर्शनाला जाताना भक्त फुले हार प्रसाद घेऊन जातात आणी श्रद्धेने साईसमाधीवर चढवत असतात..
मात्र कोरोना काळात हार फुले वाहण्यास बंदी घातली केल्याने आजही भक्तांना फुल हार वाहता येत नाही.. शिर्डी परीसरातील हजारो शेतकरी फुल शेती करतात तर अनेक व्यावसायिकांची उपजिवीका त्यावर अवलंबून आहे.
आता कोरोना संपलाय, हजारो भाविक दर्शनाला येत असूनही हार फुलावर घातलेली बंदी उठवली गेली नाही, त्यामुळे शेतकरी तसेच व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलीय.