PHOTO : आधी हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते आता निळा नाला; प्रदूषणामुळे डोंबिवलीकर हैराण!
डोंबिवली एमआयडीसी परिसर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच सोमवारी (28 मार्च) दुपारच्या सुमारास एमआयडीसी फेज 2 गणेश नगर आशापुरा मंदिर परिसरातील एका मोठ्या नाल्यातून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागल्याने खळबळ उडाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिळ्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटलेली होती. या नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांचे डोळे चुरचुरणे, मळमळणे यांसारखे त्रास सुरु झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
डोंबिवलीकरांनी आधी हिरव्या पावसाचा अनुभव घेतला आहे.
तर गुलाबी रस्तेही डोंबिवलीकरांनी पाहिले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीतील काही कंपन्यामधून थेट नाल्यात सोडल्या जाणाऱ्या घातक केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कायमच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. या प्रदूषणावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.