Nashik Rainfall Impacts Farmers: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला! पाहा फोटो
द्राक्षापाठोपाठ नाशिकमध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जात. मात्र, पावसाचा या कांद्याच्या पिकाला देखिल चांगलाच फटका बसला असून ही पिकं खराब झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाईट बाब म्हणजे वर्षभर उभ केलेल गव्हाचं आणि मक्याचं पिक दोन तासाच्या पावसाने पूर्णपणे झोपलंय.
आधीच लॉकडाऊनचा फटका, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता हा बेमोसमी पाऊस या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला असून देवाने आता जास्त अंत पाहू नये यासोबतच मायबाप सरकारने काहीतरी मदत करावी अशीच अपेक्षा तो व्यक्त करतोय.
द्राक्ष, कांदा यापाठोपाठ गहू, मका, हरभरे, डाळिंब यासह भाजीपाल्याचंही या पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
आधीच कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक संकटात सापडला असून कुठेतरी भाव मिळेल या आशेने तो जगतोय आणि त्यात अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे.
नाशिकची ओळख तशी द्राक्षनगरी मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हिच द्राक्ष आता धोक्यात आली आहेत.
खरं तर ही सर्व दृश्य बघून नाशिकला पावसाने कसं झोडपून काढलय याचा अंदाज तुम्हाला आला असेल. नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. खासकरून सिन्नर, निफाड या भागात तर वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्याने द्राक्षबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या.
ऐन थंडीत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. तर मक्याची पिकं झोपली असून कांदा खराब झालाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -