✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : PSLV-C51 च्या माध्यमातून 19 उपग्रह अवकाशात झेपावले, या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम

एबीपी माझा वेब टीम   |  28 Feb 2021 12:12 PM (IST)
1

या वर्षातील भारतातील हे पहिले अवकाश अभियान PSLV साठी बरंच मोठं असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास 55 मिनिटं आणि 7 सेकंदांपर्यंत असणार आहे. आता भारताने प्रक्षेपित केलेल्या एकूण परदेशी उपग्रहांची संख्या वाढून 342 झाली आहे. (Credit - ISRO twitter)

2

श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी 14 एनएसआयएलची निर्मिती आहे. (Credit - ISRO twitter)

3

अन्य18 सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेसमधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. (Credit - ISRO twitter)

4

अमेझोनिया -1 च्या मदतीनं अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल, असं ISRO ने सांगितलं. (Credit - ISRO twitter)

5

PSLV-C51 हे PSLV चे 53 वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया - 1उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अ‍ॅमेझोनिया -1 प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य 18 उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किडझ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे. (Credit - ISRO twitter)

6

इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण झालं. (Credit - ISRO twitter)

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • PHOTO : PSLV-C51 च्या माध्यमातून 19 उपग्रह अवकाशात झेपावले, या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.