PHOTO | आली समीप घटिका! मानसी नाईकच्या लग्नापूर्वीच्या विधींना धुमधडाक्यात सुरुवात
मानसीच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वी मानसीने आपल्या प्रीवेडिंगचे फोटोही शेअर केले होते.
साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिलं होतं.
मानसीने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली असून ती अतिशय सुंदर दिसतेय.
19 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.
आपला बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत मानसी आपली लग्नगाठ बांधणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती.
मानसीने ग्रहमख पूजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
मानसीच्या घरी ग्रहमख पूजा पार पडली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय मॉडेल आणि अभिनेताही आहे. प्रदीपनं अनेक स्पर्धा जिंकल्या असून मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे.
बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या मानसीची लगीनघाई सुरु झाली असून तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -