Burj khalif Building : सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जाणाऱ्या बुर्ज खलिफाची जागा आता हा टॉवर घेणार?

सौदी अरेबियामध्ये जेद्दाह टॉवर बांधला जात आहे. या टॉवरला किंगडम असेही म्हणतात. असा विश्वास आहे की, हा टॉवर उंचीच्या बाबतीत बुर्ज खलिफाला मागे टाकणार. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुबईत 2010 मध्ये बुर्ज खलिफा बांधण्यात आला. त्याची उंची 828 मीटर आहे. तेव्हापासून ते जगातील सर्वात उंच मिळतात म्हणून ओळखला जातो. (Photo Credit : Pixabay)

सौदी अरेबियात निर्माणाधीन जेद्दाह टॉवर लवकरच बुर्ज खलिफाला मागे टाकून जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब पटकावणार असल्याचे बोलले जात आहे. (Photo Credit : Pixabay)
जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार, जेद्दाह टॉवरची उंची 1,000 मीटर असण्याची शक्यता आहे.(Photo Credit : Pixabay)
उत्तर जेद्दाहमध्ये असलेल्या जेद्दाह टॉवरची पुनर्बांधणी 5 वर्षानंतर 2023 मध्ये सुरू झाली. मात्र, ते बांधण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. बुर्ज खलिफाची एकूण उंची 828 मीटर आहे आणि त्यात एकूण 160 मजले आहेत.(Photo Credit : Pixabay)
जेद्दाह टॉवरला किंगडम टॉवर असेही म्हणतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ते बुर्ज खलिफापेक्षा सुमारे 162 मीटर उंच असणार आहे. जेद्दाह टॉवरचे बांधकाम जेद्दा इकॉनॉमिक कंपनी करत आहे.(Photo Credit : Pixabay)
बुर्ज खलिफापूर्वी, नॉर्थ डकोटा येथील ब्लँचार्ड येथे केव्हीएलवाय-टीव्ही मास्टने जगातील सर्वात उंच इमारतीचा विक्रम केला होता.(Photo Credit : Pixabay)
जेद्दाह टॉवरच्या महत्त्वाकांक्षी डिझाइन आणि बांधकामासाठी एकूण $1.23 अब्ज खर्च अपेक्षित आहे. (Photo Credit : Pixabay)
आगामी काळात ते बुर्ज खलिफाला उंचीच्या बाबतीत मागे सोडणार असल्याचेही बोलले जात आहे. (Photo Credit : Pixabay)
ब्रिटानिकाच्या अहवालानुसार, बुर्ज खलिफा टॉवर 4 जानेवारी 2010 रोजी औपचारिकपणे उघडण्यात आला होता, परंतु त्यावेळी त्याचा संपूर्ण भाग उघडला गेला नव्हता.(Photo Credit : Pixabay)