Saree Drapping Tips : सेलिब्रिटी स्टाईल साडी कॅरी करण्यासाठी टिप्स, खास तुमच्यासाठी!
पण अनेकवेळा असे घडते की जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा आपली फिगरही विचित्र दिसते, तर सेलिब्रिटींची साडी स्टाईल बघितली तर ते साडी खूप छान कॅरी करतात. आज तुम्ही सेलिब्रिटी स्टाईल साडी कॅरी करण्यासाठी टिप्स जेणेकरुन तुमची साडी छान दिसेल. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपदर उघडा ठेवा: तुमचे वजन तुमच्या साडीत दिसू नये आणि तुम्हाला तुमची चरबी लपवायची असेल, तर पदर मोकळा सोडा त्याच्या प्लीट्स घालू नका . [Photo Credit : Pexel.com]
तुमच्या वजनानुसार साडी निवडा: साडी निवडताना तुमची फिगर लक्षात ठेवा, जर तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही भारी साडी निवडावी, ज्यामध्ये तुम्ही बनारसीपासून कॉटन साडीची निवड करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
त्याचबरोबर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही शिफॉन, जॉर्जेटसारख्या हलक्या वजनाच्या साड्या निवडू शकता. [Photo Credit : Pexel.com]
पेटीकोट ऐवजी शेपवेअर वापरून पहा: जर तुम्हाला तुमची साडी एखाद्या सेलिब्रिटी स्टाईलसारखी दिसावी आणि तुमची फिगर दिसावी असे वाटत असेल तुम्ही बॉडी फिटेड शेपवेअर घालू शकता. [Photo Credit : Pexel.com]
तर साडीसोबत पेटीकोट घालण्याऐवजी तुम्ही कोणत्याही मूळ रंगाचे शेपवेअर घेऊ शकता जे तुमच्या बहुतेक साड्यांसोबत जाते. [Photo Credit : Pexel.com]
रंगांवर विशेष लक्ष द्या : तुम्ही साडी नेसत असाल तर तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसली आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. [Photo Credit : Pexel.com]
खूप गडद रंगाची साडी नेसल्याने शरीर सडपातळ दिसते. त्याचबरोबर हलक्या रंगाची साडी नेसल्यास तुमचे वजन अधिक दिसते. [Photo Credit : Pexel.com]
खूप लहान प्लीट्स बनवू नका: जेव्हा तुम्ही साडीमध्ये कंबरेजवळ प्लीट्स बनवता तेव्हा ते खूप लहान करू नका.मोठे प्लीट्स घ्या आणि त्यांना समान रीतीने टक करा आणि नंतर स्ट्रेटनरच्या मदतीने तुमचे प्लीट्स सेट करा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]