MOTHER'S DAY 2024 : तुम्हाला माहित आहे का काय आहे मदर्स डे चे महत्व ? नाही , तर येथे जाणून घ्या !
आई चांगले वाईट ओळखायला शिकवते.आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून आईला द्यावा.आपण आज जे काही आहोत त्यात आपल्या आईची भूमिका अत्यंत मोठी आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतथापि मातांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही परंतु मातांना योग्य ते प्रेम आणि आदर मिळावा म्हणून जगभरात दरवर्षी मे महिन्यात मातृदिन साजरा केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
भारतात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. 2024 मध्ये हा दिवस 12 मे रोजी येत आहे . [Photo Credit : Pexel.com]
हा दिवस सर्व मातांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे आणि या दिवशी लोक त्यांच्या आईच्या प्रेमाची आणि त्यागाची प्रशंसा करतात आणि तिला भेटवस्तू, फुले, कार्डे आणि इतर प्रेमळ भेटवस्तू देतात. [Photo Credit : Pexel.com]
मदर्स डे जगभरातील 50 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो, परंतु त्याची तारीख सर्वत्र बदलते. भारत आणि अमेरिकेत हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
ब्रिटनमध्ये, लोक मार्च महिन्यात मदर्स डे साजरा करतात, जो इस्टरच्या तीन आठवडे आधी येतो. जाणून घ्या मदर्स डेची सुरुवात कशी झाली[Photo Credit : Pexel.com]
मदर्स डेची सुरुवात अमेरिकेतून झाली.1900 च्या दशकात ॲना जार्विस नावाच्या महिलेने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा दिवस सुरू केला. तिची आई 1905 मध्ये मरण पावली होती.[Photo Credit : Pexel.com]
ॲनाने सर्व मातांच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करायचा होता.म्हणून,त्यांनी 1908 मध्ये वेस्ट व्हर्जिनियाच्या ग्रॅफ्टनमध्ये मे महिन्यात प्रथमच मातृदिन साजरा केला.[Photo Credit : Pexel.com]
जाणून घ्या कोणत्या देशात मदर डे कधी साजरा केला जातो?भारत - मे महिन्याचा दुसरा रविवार तसेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) मे महिन्याचा दुसरा रविवार रोजी मदर्स डे साजरा केला जातो .[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]