Tomato Face Pack : टोमॅटो फेस पॅक वापरा , येईल चेहऱ्यावरील चमक !
अशा परिस्थितीत तुम्ही काही नैसर्गिक उपाय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा टोमॅटो फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करून त्याची चमक वाढवण्यास मदत करतील. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटो फेस पॅकचे फायदे: आपल्या त्वचेसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक टोमॅटोमध्ये आढळतात. यामुळेच याच्या वापरामुळे चेहऱ्याची चमक वाढते. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे केवळ चेहऱ्याचा रंगच सुधारत नाही तर मुरुमांपासून देखील आराम देते. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो-मध : टोमॅटो आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून आराम मिळतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन्ही गोष्टी मिक्स करा आणि चेहऱ्याला नीट लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा ताजे पाण्याने स्वच्छ करा. तुमचा चेहरा उजळेल. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो-लिंबू : टोमॅटो आणि लिंबू दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. तेलकट त्वचेचा त्रास असणाऱ्यांना हा फेसपॅक वापरता येईल. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो मॅश करा आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि थोडा वेळ ठेवा. यानंतर, चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.[Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो- बेसन: तुमचा चेहरा चमकदार करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि बेसनचा फेस पॅक वापरू शकता. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करते. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला चेहऱ्यावरील मुरुमांपासून सुटका हवी असेल तर दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटो-साखर: एक टोमॅटो घ्या, तो मॅश करा आणि त्यात एक चमचा साखर घाला आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी आणि सुरकुत्या दूर होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]