Winter Remedy: थंडीत घ्या त्वचेची काळजी; जाणून घ्या सोप्या टिप्स!

कोरडी त्वचा, खाज सुटणे किंवा एक्जिमा, थंडीमुळे त्वचा लाल होणे आणि पुरळ उठणे यासोबतच त्वचेवर क्रस्ट दिसणे यासारख्या समस्या हिवाळ्यात उद्भवू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या समस्या वाढण्याचे एक कारण म्हणजे त्वचेची योग्य काळजी न घेणे.

बहुतेक लोक हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी त्याच पद्धतींचा अवलंब करतात ज्या ते उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करतात. त्यामुळे त्वचेला पोषण मिळत नाही आणि त्वचा खराब होऊ लागते.
थंडीत कोमट किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते, पण जेव्हा तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुता तेव्हा त्यामुळे त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. गरम पाण्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो.
त्याचप्रमाणे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.
आंघोळीनंतर चेहरा स्वच्छ करा. असे केल्याने डोके स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे शाम्पू, कंडिशनर आणि इतर गोष्टी चेहऱ्यावर बसल्या तर ते स्वच्छ करणे सोपे होऊ शकते. आंघोळीनंतर, शेवटी कोणत्याही फेसवॉश किंवा क्लीन्झरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी तिला भरपूर पोषण द्या. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मध्यम किंवा हेवी मॉइश्चरायझर लावा.मुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला थंडीच्या प्रभावापासून संरक्षणही मिळते.
ज्या लोकांच्या त्वचेला अधिक पोषण आवश्यक आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर सीरम लावू शकतात. मॉइश्चरायझर लावल्यानंतर फेस सीरमचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामुळे पिंपल्ससारख्या समस्या देखील कमी होतात.
(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com/) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.