Winter Health Tips: हिवाळ्यात 'ही' फळे खाणे ठरेल फायदेशीर
अंजीर: अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेरू: सर्दीमुळे अनेकजण पेरू खाणे टाळतात. पण, पेरुमध्ये असणारे व्हिटामीन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
सिताफळ: हिवाळ्यात सिताफळ हे अतिशय महत्त्वाचे फळ आहे, लहान मुलांची पचनशक्ती थोडी नाजूक असते अशावेळी सिताफळ खाल्याने पचनशक्ती व्यवस्थीत राहते. यामध्ये व्हिटामीन बी6 चे प्रमाण सर्वाधिक असते.
अननस: अननसमध्येही व्हिटामीन सीचे प्रमाण सर्वाधिक आहे. अननस देखील दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.अननसात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात.
सफरचंद: सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यातील फायबर, व्हिटामीन सी आणि के असल्याने शरीराला फायदा होतो.
गाजर: हिवाळ्यात गाजर खाणे फायदेशीर आहे. गाजरातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
डाळिंब: थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होते.
संत्र: संत्र्यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा त्याचा समतोल राखण्यासाठी संत्र्याची खूप मदत होते.
स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते. त्याशिवाय व्हिटामीन सी आणि बीचे प्रमाण अधिक असते. शरीरातील साखरेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो.
हिवाळ्यात फळांचे सेवन करण्याआधी तु्म्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.