Health Tip:चाला फक्त १० मिनिटं, सांधे होतील मजबूत आणि शरीर राहील हलकं-फुलकं!

दररोज थोडं चालणं ही तंदुरुस्त राहण्याची सोपी आणि नैसर्गिक पद्धत आहे. चालल्याने शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न होतं. जाणून घ्या सविस्तर...

Continues below advertisement

Health Tips

Continues below advertisement
1/11
चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे. चालल्याने मूड फ्रेश राहतो आणि नैराश्यापासून आराम मिळतो.
2/11
आजच्या काळात अनेक लोकं लठ्ठपणाने त्रस्त आहेत. दररोज चालल्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य निरोगी राहील.
3/11
आपण दिवसभर साधारणपणे सरळ, सपाट आणि जलद चालतो. पण अशा चालण्यामुळे कालांतराने स्नायू आणि सांधे कमकुवत होऊ शकतात. विशेषतः ४० वर्षांच्या वयानंतर, पाय, शिन आणि कंबरेच्या स्नायूंना पुरेशी व्यायामाची संधी मिळत नाही, त्यामुळे सांधे कडक होऊ लागतात.
4/11
रोज एकाच प्रकारे चालल्यामुळे शरीराचा काही भाग कमी हालचाल करायला सुरुवात होते आणि त्यामुळे वय वाढल्यानंतर दुखणं आणि कमजोरी याची शक्यता वाढते.
5/11
तुम्ही पंजांवर चालल्याने पाय आणि पाठ मजबूत होईल आणि योग्य पोस्चर ठेवण्यास मदत होईल.
Continues below advertisement
6/11
तुमची छाती सरळ ठेवा, डोळे पुढे करा आणि हात मोकळे ठेवा. यामुळे स्नायू आणि पाठीच्या कण्याचे स्नायू मजबूत होतात.
7/11
१० पावलं टाचांवर आणि मग १० पावलं नेहमीसारखी चाला. अशा पद्धतीने दोन्ही प्रकार करून चालल्यास शरीराला सवय लागते आणि स्नायू मजबूत होतात.
8/11
जर तुम्ही हा व्यायाम केला तर तुमच्या कंबरेचा भाग मोकळा होतो, पाठ सैल होते आणि चालणं अधिक आरामदायक व प्रभावी होतं.
9/11
मागे चालणं सोपं वाटत असलं तरी त्याचे फायदे खूप आहेत संतुलन सुधारतं, गुडघ्यांना आराम मिळतो आणि पाय मजबूत होतात.
10/11
तुम्ही हे छोटे व्यायाम रोजच्या व्यस्त वेळातही करू शकता. फक्त तुम्हाला योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola