विटामिन D मिळवण्यासाठी रोज किती वेळ सूर्यप्रकाशात बसावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

विटामिन D कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण सुधारतं, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Continues below advertisement

VitaminD

Continues below advertisement
1/8
विटामिन D हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेलं पोषक घटक आहे. हे फक्त हाडं मजबूत ठेवत नाही, तर शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये देखील सहभागी असतं.
2/8
ण आश्चर्य म्हणजे भारतासारख्या उन्हाळी देशात राहूनही अनेक लोक विटामिन D च्या कमतरतेने त्रस्त आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे बदललेला जीवनशैलीचा पॅटर्न.
3/8
आजच्या काळात बहुतांश लोक दिवसाचा बराचसा वेळ घरात, ऑफिसमध्ये किंवा बंद जागांमध्ये घालवतात. यामुळे त्वचेला सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो आणि शरीरात नैसर्गिकरीत्या विटामिन D तयार होणं थांबतं.
4/8
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, दररोज सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान किंवा सायंकाळी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान सूर्यप्रकाशात बसणं सर्वात योग्य असतं. या वेळेत सूर्यकिरणांमधील UVB किरणं त्वचेवर पडल्यास शरीर नैसर्गिकरीत्या विटामिन D तयार करतं.
5/8
साधारणपणे १५ ते ३० मिनिटं सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीराला आवश्यक प्रमाणात विटामिन D मिळू शकतं.
Continues below advertisement
6/8
विटामिन D मिळवण्यासाठी ऊन घेण्याचे काही नियम पाळणंही महत्त्वाचं आहे. चेहरा, बाहू, हात आणि पाय सूर्यप्रकाशात किमान २०-२५% उघडे असावेत.
7/8
काचेमागून ऊन घेण्याचा काही उपयोग होत नाही, कारण काचेतून UV किरणं आरपार जात नाहीत. ऊन घेताना सनस्क्रीनचा वापर करू नका, कारण तो विटामिन D तयार होण्याची प्रक्रिया थांबवतो.
8/8
जर तुम्हाला पुरेसं ऊन मिळत नसेल, तर आहारातूनही हे विटामिन मिळवता येतं. सॅल्मन, टूना फिश, अंड्याची पिवळी बलक, फोर्टिफाइड दूध, आणि मशरूम हे विटामिन D चे उत्तम स्रोत आहेत.
Sponsored Links by Taboola