Vitamin B12 Vegetarian Source: शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी -12 चे 5 स्त्रोत, आहारात नक्की करा समाविष्ट
Vitamin B12 Rich Food: मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी-12 शरीराला अॅनिमिया, कावीळ, अल्झायमर आणि इतर अनेक धोकादायक आजारांपासून वाचवण्याचे काम करते. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असताना मेंदू आणि मज्जासंस्था सर्वात जास्त प्रभावित होतात. व्हिटॅमिन बी-12 समृद्ध असलेले शाकाहारी पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोयाबीन- सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी-12 मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन बी-12 साठी तुम्ही सोया मिल्क, टोफू किंवा सोयाबीन तेल देखील वापरू शकता.
दुग्धजन्य पदार्थ- व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता अन्नात दूध, दही आणि चीज यांचा समावेश करून भरून काढता येते. व्हिटॅमिन बी-2, बी-1 आणि बी-12 दह्यामध्ये आढळतात. दूध आणि चीजमध्ये व्हिटॅमिन बी-12 चांगल्या प्रमाणात आढळते.
ओट्स- ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. ओट्स केवळ वजन कमी करत नाही तर भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे देखील देतात. ओट्स हे व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे. ओट्स खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते.
मशरूम- मशरूम व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन बी-12 व्यतिरिक्त, प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह देखील मशरूममध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय मशरूममध्ये विरघळणारे बीटा-ग्लुकन असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
ब्रोकोली- तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता, जरी ती सर्वांनाच आवडत नसली तरी, तुम्ही तिचे सेवन केले पाहिजे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन बी 12 सोबत फोलेट असते, जे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होऊ देत नाही. (यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)