Tulsi Rules : राम आणि कृष्ण तुळसमध्ये नेमका फरक काय? घरात कोणती तुळस शुभ असेल? वाचा सविस्तर माहिती
शास्त्रानुसार तुळशीचे विविध महत्त्व आहेत. प्रामुख्याने तुळशीचे दोन प्रकार आहेत. ते म्हणजे राम आणि कृष्ण तुळस. सर्वसामान्यांना या दोन्ही तुळशीत नेमका फरक काय हे ओळखणे कठीण होते. या ठिकाणी या दोन्ही तुळशीत नेमका फरक काय तसेच कोणती तुळस घरात लावणे शुभ मानले जाते ते समजून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृष्ण तुळस : कृष्ण तुळशीची पाने गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. असं म्हटलं जातं की, श्रीकृष्णाला कृष्ण तुळशीची फार आवड होती. या तुळशीची पाने देखील कृष्णाच्या रंगासारखीच असतात. तसेच, श्रीकृष्णाचे नावदेखील कृष्ण आहे. त्यामुळे ही तुळस कृष्ण तुळस म्हणून ओळखली जाते. मात्र, रामाच्या तुलनेत या तुळशीच्या पानांत तितका गोडवा नसतो.
राम तुळस - राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असतो. असे मानले जाते की, रामाला तुळस फार प्रिय होती. म्हणून ही तुळस राम तुळस म्हणून ओळखली जाते. राम तुळशीची पाने गोड असतात. ही तुळस घरामध्ये लावल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते. राम तुळशीचा उपयोग पूजेत देखील केला जातो.
घरामध्ये कोणती तुळशी लावावी? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर, शास्त्रानुसार राम आणि कृष्ण तुळस दोघांचेही वेगळे असे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दोन्ही तुळशी घरामध्ये लावू शकता. राम तुळशीचा वापर बहुतेक घरांमध्ये केला जातो. त्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते.
घरात तुळस लावण्यासाठी शुभ दिवस शास्त्रानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे दिवस तुळशी लावण्यासाठी शुभ मानले जातात. गुरुवारी तुळशीला अर्पण केल्यास भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. तर शनिवारी तुळशीचे रोप लावल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
तुळशीचे रोप केव्हा लावू नये? तर, एकादशी, रविवार, सोमवार, बुधवार आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीचे रोप लावणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवसात तुळशीची पाने तोडू नयेत.