Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget Friendly Destinations : गोव्याला जायचंय बजेट नाहीय? 'या' बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन ट्राय करा
अनेकांची गोवा (Goa Beach) फिरण्याची इच्छा असते. पण बजेटमुळे (Budget) अनेकांचं गोवा फिरण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमचीही गोवा फिरण्याची इच्छा असेल, पण बजेटमुळे ही इच्छा अपुरी राहिली असेल तर तुमच्यासाठी छान पर्याय आहे. या बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन (Budget Friendly Destinations) तुम्हाला गोव्याप्रमाणे वाईब्स देतील.
तुम्हाला गोव्यासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी लक्षद्वीप डेस्टिनेशनपेक्षा चांगलं डेस्टिनेशन असूच शकत नाही. हे सामान्य बजेटपेक्षा थोडं महाग आहे, पण तुम्हाला आपण गोव्यापेक्षा कमी खर्च येईला.
लक्षद्वीप : लक्षद्वीप (Lakshadweep) हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्रकिनारे भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणले जातात. येथे तुम्हाला परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील.
image 10
कन्याकुमारी : कन्याकुमारी (Kanyakumari) हे भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्र किनारे, उत्कृष्ट वास्तुकला आणि मंदिरे फार सुंदर आहे.
तुम्ही कुठेही ट्रिपचं नियोजन करत असाल, तर कन्याकुमारीला तुमच्या यादीत नक्की समावेश करा. कन्याकुमारीमध्ये राहणं खूप स्वस्त आहे आणि येथील प्रवासही खूप स्वस्त आहे.
गोकर्ण : दक्षिणेतील प्रसिद्ध समुद्रकिनारा नंदनवन गोकर्ण (Gokarna) बजेट फ्रेंडली आणि लक्झरी प्रवास करणाऱ्यांसाठीच आकर्षिण आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता.
येथील समुद्रकिनाऱ्यांवर तुम्हाला गोव्यासारखा अनुभव मिळेल. जर तुम्ही बजेट फ्रेंडली प्रवास करत असाल तर या ठिकाणाला नक्की पसंती द्या.
पुद्दुचेरी हे फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा एकत्र अनुभव घेण्यासाठीच उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला स्वस्तात प्रवास करायचा असेल आणि तर तुमच्यासाठी पुद्दुचेरी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
पुद्दुचेरी : भारतातील बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणजे पुद्दुचेरी (Puducherry). फ्रेंच क्वार्टर, समुद्र किनारे, आरामदायक कॅफे आणि मंदिरं हे पुद्दुचेरीमधील आकर्षण आहे.