Knee Pain : निरोगी हाडांचे रहस्य, 'या' सवयींमुळे हाडं होऊ शकतात कमकुवत!

Knee Pain : दैनंदिन चुकीच्या सवयी, पोषणाची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोणत्याही वयात हाडे कमकुवत होऊन वेदना व थकवा वाढू शकतो.

Continues below advertisement

Knee Pain

Continues below advertisement
1/11
हाडे फक्त वाढत्या वयातच कमजोर होतात असा अनेकांचा समज असतो. पण दैनंदिन सवयींमुळे हाडांची ताकद वाढूही शकते आणि कमीही होऊ शकते.
2/11
व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक जण स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. चुकीच्या सवयींमुळे शरीराची हळूहळू हानी होत असते पण आपल्याला ते जाणवत नाही.
3/11
डेली रूटीनमध्ये केलेल्या काही चुका हाडे कमकुवत करण्याचे कारण ठरतात. हाडे कमकुवत झाल्यावर गुडघेदुखी आणि थकवा वाढू लागतो.
4/11
कमी वयातसुद्धा बोन हेल्थचे प्रॉब्लेम्स वाढताना दिसतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डीची गरज असते.
5/11
धूप न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. दररोज किमान वीस मिनिटं सूर्यप्रकाश घेणे हाडांसाठी फायद्याचे असते.
Continues below advertisement
6/11
जास्त वेळ बसून काम केल्याने पाठीचा कणा कमकुवत होऊ लागतो. खूप वेळ एका पोजिशनमध्ये बसल्याने ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होतो.
7/11
कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता हाडांची घनता कमी करते. फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडमुळे पोषक घटकांची कमतरता वाढू शकते.
8/11
पुरेसे पाणी न पिल्यास सांधे लवकर कोरडे होतात आणि वेदना वाढतात. पाण्याची कमतरता बोन मॅरोच्या कार्यक्षमतेलाही प्रभावित करते.
9/11
मोबाईलचा जास्त वापर झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतो. उशीरा झोपल्याने शरीरातील हाडांच्या पेशी कमजोर होऊ शकतात.
10/11
दररोज पुरेशी झोप घेतल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. निरोगी हाडांसाठी संतुलित आहार, चालणे आणि योग्य झोप अत्यंत महत्त्वाची असते.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola