Sweet Lemon Benefits : वजन कमी करण्यापासून ते चमकदार त्वचेपर्यंत वाचा मोसंबीचे फायदे
लिंबू वर्गातील एक वनस्पती म्हणजे मोसंबी. मोसंबे वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोसंब्याच्या फळात सर्वसाधारणपणे 30–50% रस असतो. रसात 7·7% शर्करा आणि 0·3% आम्ल, व्हिटॅमिन बी, सी आणि इतर काही पोषक पदार्थ असतात.
मोसंबीचा ज्यूस हा आरोग्यासाठी खूपच चांगला असतो. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते.
मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.
मोसंबीमध्ये पॅक्टीन आणि विटामीन सी सोबतच इतर पोषक तत्व सुद्धा असतात. जे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात.
पोटासंबंधित समस्यांवर मोसंबी गुणकारी ठरते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. मोसंबीच्या ज्यूसमध्ये मीठ टाकून पिणे अधिक फायदेशीर ठरतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.