PHOTO | श्रद्धा कपूर त्वचेला मुलायम, क्लीन आणि फ्रेश ठेवण्यासाठी करते ही कामं...
संवेदनशील त्वचा थोडेही बदल सहन करू शकत नाही. ती ताबडतोब बदलांना प्रतिसाद देते. बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या अडचणींचा सामना करत होती. पण तिला आता या समस्येतुन बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला आहे. (Photo : instagram @shraddhakapoor)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंवेदनशील त्वचेची देखभाल करणे जास्त कष्टाचे असते. अशा त्वचेचा मूड सांभाळणे देखील कठीण असते. संवेदनशील त्वचा थोडेही बदल सहन करू शकत नाही. ती ताबडतोब बदलांना प्रतिसाद देते. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या गोष्टीचा सामना करत होती. पण तिने आता या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
श्रद्धाने त्वचेची नियमीत देखभाल करूनही त्वचेचा मूड सांभाळणे कठीण झाले आहे. तसेच थोड्या काळासाठीही त्वचेवर काहीही न लावणे, हे देखील चुकीचे आहे. पण कधीकधी असे करणे गरजेचे असते कारण याचा चांगला निकाल देखील येत असतो. सतत संवेदनशील त्वचेवर काही ना काही लावल्याने त्वचेला हानी पोहचू शकते.
(Photo : instagram @shraddhakapoor)
श्रद्धा कपूर सांगते की, तिची त्वचा खूपच जास्त संवेदनशील आहे. त्वचेला स्वच्छ आणि उल्हासित ठेवण्यासाठी ती प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन वेळा चेहरा धुते. त्यासोबतच दोन्ही वेळा चेहरा मॉइस्चरायजर पण करते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करणे आणि ती मॉइस्चराइज करणे किंवा नाईट क्रीम लावणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य पोषण मिळते.
श्रद्धाची आवडती मेकअपची गोष्ट कंसीलर आहे. ते नेहमीच तिच्या मेकअप किटमध्ये असते. तिच्या चेहऱ्याचा मूड सांभाळण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरूमं लपवण्यासाठी ती याचा उपयोग करणं पसंत करते. श्रद्धा सांगते की, कंसीलर लावल्याने चेहऱ्यावरील मेकअपची थर झाकली जातात. आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा जाडपणा दिसून येतो.
(Photo : instagram @shraddhakapoor)