Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : या कलाकारांनी मालिकेला केले बाय-बाय!
कित्येक भागांचा पल्ला पार केलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत आजपर्यंत अनेक चेहरे रिप्लेस करण्यात आले आहेत. तरीही एक चेहरा असा आहे ज्याला अजूनही रिप्लेसमेंट मिळालेली नाही. तो चेहरा आहे दयाबेनचा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नेहमीच सर्वात पुढे आहे. कोरोना वायरसच्या महामारीत लॉकडाऊनमुळे मालिका कित्येक दिवस बंद होती. परंतु लॉकडाऊन खोलल्यावर आणि शुटिंग पुन्हा सुरळीत झाल्यावर नव्या एपिसोडने लोकांना परत हसवायला सुरूवात केली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी मालिका सोडली.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये झील मेहताने सोनु भिडेचे पात्र साकारले होते. तिने मालिका सोडून बरेच दिवस झाले आहेत. झीलने ही मालिका करण्यास खूप लहान वयात सुरूवात केली होती. तिने शिक्षण पुर्ण करण्यासाठी मालिका सोडली.
मालिका गुरचरण सिंहांने काही वैयक्तिक कारणासाठी सोडली होती. त्यांच्या जागेवर बलविंदर सिंहाने 'सोढीचे' पात्र साकार केले. गुरचरण सिंहांच्या वडिलांची सर्जरी झाली आहे. त्यामुळे ते शुटिंगला जात नाहीत. कारण त्यांना त्यांच्या वडिलांसोबत वेळ घालवायचा आहे.