Shrawan Somwar : शेवटचा श्रावण सोमवार, परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

Shrawan Somwar 2023 : श्रावण महिन्यातील आज शेवटचा सोमवार असल्याने राज्यभरातील महत्वाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Shrawan Somwar 2023

1/8
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या शेवटच्या म्हणजेच चौथ्या सोमवारी भाविकांची मोठी रीघ लागली आहे.
2/8
मंदिरात पहाटेपासूनच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
3/8
भाविक भक्तांच्या गर्दीने वैद्यनाथ मंदिर परिसर फुलला आहे. राज्य व परराज्यातून भाविक परळीत दाखल झाले आहेत.
4/8
पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
5/8
तसेच मंदिर परिसरात फुलांचे दुकाने सजली असून, भाविकांची देखील गर्दी पाहायला मिळत आहे.
6/8
मंदिर परिसराला पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.
7/8
मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टच्या वतीने सी. सी. टी. व्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
8/8
कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काळजी घेताना दिसत आहे.
Sponsored Links by Taboola